अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले   

मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर २४ तासांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत मृतांप्रति शोक व्यक्त केला. या पोस्टनंतर अमिताभ यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अमिताभ यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अरे देवा! अरे देवा! अरे देवा. मी स्तब्ध झालो. सुन्न झालो. ईश्वराची कृपा. मनापासून सर्वांसाठी प्रार्थना’, अशा शब्दांत अमिताभ यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ यांची पोस्ट येताच त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 
    
विमान दुर्घटनेनंतर अभिनेते शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आलिया भट्ट, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, विकी कौशल आणि अशा अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले. अमिताभ यांनी मात्र, घटनेच्या २४ तासानंतर ही पोस्ट लिहिल्याने नेटकर्‍यांनी त्यांना सुनावले. तुम्ही फक्त दिखाव्यासाठी आता पोस्ट करत आहात? भारतातील लोकांना तुमच्या या पोस्टची गरज नाही, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसर्‍याने आता झोपेतून जागे झाला आहात का? असे म्हटले आहे.

Related Articles